साकीनाका येथे तरुणाची हत्या

File Photo
File Photo

मुंबई : साकीनाका येथे धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून, साकीनाका पोलिसांनी अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

साकीनाका येथील एमसीजीएम पार्क येथे पर्यवेक्षक असलेले सदानंद यादव यांना तेथील एका कोपऱ्यात चादरीत काही तरी गुंडाळल्याचे आढळले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, चादरीत एका तरुणाचा मृतदेह असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर नियंत्रण कक्षाने साकीनाका पोलिसांना कळवले.

पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मृत तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळले. त्याच्या कपड्यांत एकही वस्तू नसल्यामुळे पोलिसांना मृताची ओळख पटवण्यात अद्याप यश आले नाही. याप्रकरणी सीसी टीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com