जादूटोणा केल्याच्या अंधश्रद्धेतून हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

मुंबई - जादूटोणा केल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून वाकोला येथे एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी अटक केली. अजीम अमिदशाह खान, जाहिद उमरशाद खान, गुड्डू युसूफ शेख आणि जितेंद्र जीवन यादव अशी त्यांची नावे आहेत.

सांताक्रूझ पूर्वेकडील कलिना येथील बिल्सिल्ला मिल्क सेंटरसमोर शुक्रवारी अब्दुल्ला खान (56) यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपी टॅक्‍सीतून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी वाकोला जंक्‍शन येथे पाळत ठेवली व संबंधित टॅक्‍सीतील चार जणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्या वेळी या चौघांनी अब्दुल्ला खान यांच्या हत्येची कबुली दिली. अमिदशाह खान याच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. अब्दुल्ला खान याने जादूटोणा केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय अमिदशाह याला होता. त्यातून त्याने इतर साथीदारांच्या मदतीने अब्दुल्ला यांची हत्या केल्याचा उलगडा झाला आहे.

Web Title: Murder by Superstition Crime