उल्हासनगरात दिवाळी-लक्ष्मीपूजनाला खुनाचे गालबोट

दिनेश गोगी
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

उल्हासनगर : सर्वत्र दिवाळीचा जल्लोष सुरू असतानाच काल लक्ष्मीपूजनाच्या रात्री किरकोळ वादातून 17 वर्षीय तरुण शिवसैनिकाचा खून झाल्याने या सणाला खुनाचे गालबोट लागले आहे. दिवाळीच्या सणात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव नवीन चौधरी असून तो शिवसेना उपविभाग प्रमुख दशरथ चौधरी यांचे पुतणे होते.

दोन महिन्यात खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत. बहुतांश घटना या नशेकरी टिन एजर तरुणांच्या हातून घडत असून पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धाड-पकडसत्राची मोहीम हाती घेऊन हे धंदे उखडून टाकले नाहीत तर शिवसेना एल्गार पुकारणार असा इशारा शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिला आहे.

कॅम्प नंबर 3 मधील सम्राट अशोक नगरातील चौकात नवीन चौधरी,करण भालेराव,सागर उबाळे आदी मित्र गप्पा मारत बसले होते.तेंव्हा कुशल निकम व राहुल भोसले हे भरधाव वेगाने ऍक्टिवा दुचाकीवरून जात असताना दुचाकीचे चाक सागर उबाळे याच्या पायावरून गेल्याने त्यांच्यात शिवीगाळ झाली.त्यावर तुम्ही इथेच थांबा,बघून घेतो असे रागात म्हणून गेल्यावर ते काही तरुणांना सोबत घेऊन आल्यावर त्यांनी हल्ला केला.

धारदार हत्याराने नवीन चौधरी याच्यावर वार केल्यावर नविनचा जागीच मृत्यू झाला.ही अनपेक्षित घटना घडल्यावर व आरोपी फरार झाल्यावर नविनच्या समर्थक मित्रांनी परिसरातील दुचाकी वाहनांची नासधूस केली.त्यात मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष,वृत्तमानसचे वार्ताहर रामेश्वर गवई यांच्या दोन गाड्यांचा समावेश आहे.

घटना घडल्यावर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,उपशहर संघटक संदीप गायकवाड,युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे,उपविभागप्रमुख मोहिते,मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस,पोलीस निरीक्षक(गुन्हे)अविनाश काळदाते,अशोका फाऊंडेशनचे संस्थापक शिवाजी रगडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,उपशहर संघटक संदीप गायकवाड आरोपींच्या अटके सोबतच अमली पदार्थांची विक्री करणारे धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.अन्यथा आंदोलनकेले जाणार असा इशारा दिला आहे. शिवाजी रगडे यांनी देखील आरोपी कुणीही असोत त्यांना गजाआड करण्याची मागणी केली असून लवकरच स्वखर्चाने सम्राट अशोक नगरात सिसिटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Murder in Ulhasnagar, shiv sena to protest against drug addicts