पत्नीच्या आजारपणाला व कर्जाला कंटाळून केला खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

पतीला अटक

मुंबई : पत्नीचे आजारपण व घेतलेली कर्जे यांना कंटाळून पवईत 67 वर्षीय पतीने आठवड्याभरापूर्वी पत्नीची हत्या करून पलायन केले, मात्र पोलिसांनी नुकत्याच त्याच्या मुसक्‍या आवळल्या.

अलिबाग-पेण मार्गावरील अपघातात दोन ठार... कसा झाला अपघात?

पवईतील सुखशांती इमारतीत हे दाम्पत्य राहात होते. त्यांना मूलबाळ नव्हते. गेले काही दिवस पत्नी शीला आजारी असल्यामुळे अजित लाड कंटाळून गेला होता. त्याने घेतलेल्या कर्जांची परतफेड करताना पुष्कळ पैसे जात नसल्यानेही तो वैतागला होता. सोमवारी (ता.10) संध्याकाळी त्याने पत्नीच्या डोक्‍यात जड वस्तू डोक्‍यात मारून तिची हत्या केली. त्यापूर्वी त्याने तिचे मनगटही कापले व नंतर तिचा गळाही आवळला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो घर सोडून पळून गेला.

शरीरात रक्‍ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देऊ... कोण बोलले हे?

आपण पत्नीची हत्या करत असून आत्महत्या करण्यास जात आहोत, असे पत्र त्याने घर सोडण्यापूर्वी लिहिले होते. तो पळून ठाण्याला गेला व तेथे त्याने आपले मनगट कापण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र कसारा पोलिसांनी त्याला शोधून अटक केली, असे पोलिस उपायुक्त (झोन 10) अंकित गोयल यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of wife for her illness and debt