नालासोपाऱ्यात महिलेचा गळा चिरून खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

नालासोपारा - पूर्वेकडील धानिव बाग येथे विवाहितेचा गळा चिरून खून झाल्याचे समोर आले आहे. सरोज जयस्वाल (वय 25) असे तिचे नाव आहे. ती तीन दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या घरापासून काही अंतरावर शनिवारी (ता. 31) तिचा मृतदेह सापडला. वालिव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सरोज ही धानिव बाग गावदेवी परिसरात राहत होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार वालिव पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिस तपास सुरू असतानाच तिच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर एका बंद खोलीत शनिवारी तिचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला. या खोलीत फेरीवाल्याचा व्यवसाय करणारी पाच-सहा मुले राहतात. खून झाल्यापासून ही मुले पळून गेल्याने त्यांच्यापैकी कुणीतरी हे कृत्य केले असावे, असा पोलिसांना संशय आहे. मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल मिळाल्यावर नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. वालिव पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Murder of Women