70 रुपयांसाठी तरुणाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

मुंबई - अवघ्या 70 रुपयांच्या चोरीवरून झालेल्या भांडणातून तरुणाची हत्या करण्यात आली. सोमवारी (ता. 2) रात्री गोरेगाव परिसरात हा प्रकार घडला. विकास अशोक बल्लाड (वय 25) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी मनोज पोपट मिसाळ याला अटक केली. 

गोरेगाव पश्‍चिमच्या लालमाती झोपडपट्टी रस्ता परिसरात विकास राहत होता. सोमवारी रात्री काही जण तेथे दारू प्यायला बसले होते. त्या वेळी मनोजच्या पाकिटातील 70 रुपये गहाळ झाले. फरीद याने पैसे चोरल्याचा संशय मनोजने व्यक्त केला. या वादातून मनोज आणि फरीद यांच्यात हाणामारी झाली. त्या वेळी विकास त्यांचे भांडण सोडवायला गेला. फरीदला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा राग आल्याने मनोजने विकासलाच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने त्याचे डोके दुकानाच्या शटरवर आपटले. यात विकास गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात माहिती मिळताच बांगूरनगर पोलिस घटनास्थळी पोहचले. विकासच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत मनोजला अटक केली.

Web Title: The murder of the youth for 70 rupees