चोरीच्या उद्देशाने हत्या करणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

मुंबई : चोरीच्या उद्देशाने रिक्षाचालकाची हत्या करणाऱ्या गोविंद नकुल रॉयला जुहू पोलिसांनी अटक केली. रॉयच्या दुसऱ्या अल्पवयीन साथीदाराची रवानगी डोंगरीच्या बालगृहात केली. गोविंदला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संजय लालदेव चौधरी (53) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. 

संजय चौधरी हा विलेपार्लेच्या नेहरूनगर परिसरात कुटुंबीयासोबत राहत होता. सहा दिवसांपूर्वी "संजयची प्रकृती खालावली असून लवकर या', असा फोन त्याची पत्नी गीताला आला होता. गीता तेथे आपल्या मुलीसोबत गेली असता तो रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला.

स्थानिकांच्या मदतीने संजयला उपचाराकरिता प्रथम कूपर व त्यानंतर नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संजयचा मुलगा शिवमने त्या रात्री घडल्या प्रकाराची माहिती नातेवाईकांना दिली. चेहरा झाकलेला एक जण चोरीच्या हेतूने धारदार शस्त्राने संजयवर वार करत होता.

वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या शिवमवरही एकाने चाकूने हल्ला करत खोलीबाहेर काढले. त्यानंतर शिवमने मदतीकरिता आरडाओरड केली. घडल्या प्रकाराची माहिती कळताच जुहू पोलिस घटनास्थळी गेले.

तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी गोविंदला ताब्यात घेतले. गोविंदने हल्ल्याची कबुली दिली आहे. दरम्यान चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या संजय याचा रविवारी (ता.29) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Murderer arrested in Mumbai