मित्राकरवी आईचा खून करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई - कौटुंबिक वादातून मुलाने मित्राला सांगून स्वत:च्या आईवर प्राणघातक हल्ला केल्याचे उघड झाले आहे. या चाकूहल्ल्यात 42 वर्षीय महिला जखमी झाली आहे. तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांनाही अटक झाली आहे. बोरिवलीत राहणाऱ्या या महिलेचे मुलाशी नेहमी वाद होत असत. रविवारी (ता.16) रात्री 10.30 वाजता ही महिला व मुलगा घरात होते. त्या वेळी एक तरुण त्यांच्या घरात घुसला.

त्याने महिलेवर चाकूहल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या महिलेने आरडाओरडा केल्यावर शेजारी धावत आले. त्यांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या महिलेच्या मुलाने सांगितल्यानुसार आपण हल्ला केल्याचे अटक झालेल्या तरुणाने पोलिसांना सांगितले. दोन्ही तरुण महाविद्यालयात शिकत आहेत.

Web Title: murderer attack

टॅग्स