मूर्ती तस्करीप्रकरणी कारवाईचा फास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मुंबई - भारतातील पुरातन मूर्तींची तस्करी करून त्या परदेशांत विकल्याप्रकरणी अनिवासी भारतीय विजय नंदा व त्याचा सहकारी उदित जैनविरोधात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) कारवाईचा फास आवळला आहे. सीमाशुल्क कायद्यांतर्गत ही प्रक्रिया चालणार आहे.

अमेरिकेचा नागरिक असलेल्या नंदाला "डीआरआय'ने गेल्या वर्षी गिरगाव येथून अटक केली होती. त्याच्याकडून देवी-देवतांच्या 13 पुरातन मूर्ती हस्तगत करण्यात आल्या होत्या. या मूर्ती अमेरिका, लंडन व हॉंगकॉंग येथे विकल्या जाणार होत्या, असे तपासात निष्पन्न झाले होते. सीमाशुल्क विभागाने या माहितीवर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार नंदा यांना 16 कोटी 18 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या तीन कोटी किमतीच्या 47 मूर्ती जप्त करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या मूर्ती परदेशांत नेण्यासाठी नंदाला मदत करणाऱ्या कंपनीलाही संबंधित विभागाने दंड आकारला आहे.

तस्करी कशाची?
जैनने नंदासाठी गुप्त काळातील सात सोन्याच्या अंगठ्या हॉंगकॉंगमध्ये पाठवल्या. पहिल्या शतकातील टेराकोटाच्या मूर्ती, महिषासुरमर्दिनीच्या 17-18 व्या शतकातील मूर्ती, गणेशाच्या कांस्यमूर्ती, तसेच 10-11 व्या शतकातील दक्षिण भारताच्या मंदिरातून उखडून आणलेल्या वरद गणेश, पद्मपाणी, अवलोकितेश्वर, उभा विष्णू, नाग-नागीण आदी मूर्ती त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या होत्या.

Web Title: Murti Smuggling Crime