मुस्लिम आरक्षणाला बाधा?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

मुंबई - मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे मुस्लिम आरक्षणाला बाधा येते, अशा आरोपाची जनहित याचिका आमदार इम्तियाज जलील यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर राज्य सरकारने खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने गुरुवारी (ता. १०) राज्य सरकारला दिले. 

औरंगाबादचे एमआयएमचे आमदार जलील यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. या निर्णयामुळे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला बाधा येते, असा दावा आमदार जलील यांनी केला आहे. आमदार असूनही विधिमंडळात झालेल्या आरक्षणाच्या निर्णयाला याचिकाकर्ते कसा विरोध करतात, असा प्रश्‍न सरकारी पक्षाने उपस्थित केला. विधिमंडळात निर्णय झाला तेव्हा काही न बोलता न्यायालयात याचिका करण्याची भूमिका अनाकलनीय आहे, असेही सरकारी वकील म्हणाले. 

या याचिकेतील मुद्द्यांबाबत राज्य सरकारने खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. पुढील सुनावणीला महाधिवक्‍त्यांनी हजर राहावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली.

Web Title: Muslim Reservation Issue High Court