मुस्लिम समाजातील मुलांनी शिक्षणाकडे वळावे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

पालघर - मुस्लिम समाजातील मुलांनी शिक्षण घेणे गरजेचे आहे, यासाठी त्यांनी शिक्षणाकडे वळावे, असे आवाहन कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी केले.

पालघर - मुस्लिम समाजातील मुलांनी शिक्षण घेणे गरजेचे आहे, यासाठी त्यांनी शिक्षणाकडे वळावे, असे आवाहन कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी केले.

पालघर येथील लायन्स क्‍लबच्या सभागृहात पालघर तालुका अल्पसंख्याक विभागातर्फे मेळावा झाला. या वेळी गावित म्हणाले, आपण मंत्री असताना अल्पसंख्याक समाजाच्या शाळांसाठी अनेक कामे केली. मुस्लिम समाजातील मुलांनी शिक्षण घेणे गरजेचे आहे. तरच समाजाची प्रगती होऊ शकेल. सय्यद कमिटीच्या शिफारसी लागू कराव्यात, अशी मागणी आपण केली आहे. मुस्लिम समाजातील काही तरुण शिवसेना-भाजपकडे जात आहेत. हे त्यांच्या हिताचे नसून त्यांना न्याय फक्त कॉंग्रेस पक्षच देऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. या वेळी प्रदेश कॉंग्रेसचे केदार काळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्तफा मेनन, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, रफिक भुरे, शमीम शेख, असिफ मेनन, शब्बीर शेख, बाबूभाई खान, मोमेज शेख, हफिज शेख, हजरउद्दीन, अरविंद परमार, माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर, परवेज शेख, चंद्रकिशोर चौधरी, कमलेश वारेय्या, पूनमचंद जैन उपस्थित होते.

Web Title: Muslim youth Must turn to Education