पूरग्रस्तांसाठी पालीतील मुस्लिम एकवटले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रात महापुराने हाहाकार माजवला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीला अनेकांचे हात सरसावले आहेत. पालीतील मुस्लिमांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. बकरी ईदनिमित्त इदुल अजहाची नमाज पठन केल्यानंतर जामा मस्जिद पाली इथे मदतीची झोळी पसरवून आर्थिक निधी गोळा करण्यात आला. येथील अजीज पानसरे, इम्तियाज पठाण यांनी कुर्बानीचा खर्च टाळून जमा झालेले पैसे पूरग्रस्तांना दिले आहेत.

बकरी ईदनिमित्त सर्वच मुस्लिम बांधव येथील मशिदीमध्ये जमा झाले होते. या वेळी सर्वांनी मिळून कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले. मग मदतीची झोळी पसरविण्यात आली. या वेळी सर्वच मुस्लिमांनी झोळीत सढळ हस्ते भरभरून निधी जमा केला. हा जमा झालेला मदतनिधी पाली तहसीलदारांकडे देण्यात येणार आहे.

या वेळी सुलतान बेनसेकर, महम्मद अली धनसे, बशीरभाई परबळकर, इम्तियाज पठाण, अजीज पानसरे, इस्माईल परबळकर, हुसेन लद्दु, युसूफ पठाण, असिक मणियार, इमदाज पठाण, समद पठाण, एजाज पानसरे आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslims in Pali converge for flood victims