नगर: शेवगावजवळ दोन मृतदेह आढळले

सूर्यकांत नेटके
सोमवार, 17 जुलै 2017

रामनाथ गोर्डे ( वय 35, रा. धनगरगल्ली शेवगाव) मंगल अनिल अळकुटे (वय 36, रा. दहिगांव ता. शेवगाव) अशी दोघांची नावे आहेत. तर बाळू रमेश केसभट (वय 28, रा. श्रीराम कॉलनी शेवगाव) असे जखमीचे नाव आहे.

नगर : नगर जिल्ह्यातील शेवगाव शहराजवळ असलेल्या अखेगाव रस्त्यालगत 80 फुटाच्या अंतरावर असलेल्या परिसरात दोन मृतदेह आढळले आहेत. त्यात एक महिला व एक पुरुष आहे. त्याचबरोबर एक पुरुष गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत सापडला आहे.

सकाळी फिरणाऱ्या लोकांना ही बाब निदर्शनास आल्यावर त्यानी ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमीला उपचारासाठी नगरला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील लोकांनी या परीसरात खूप गर्दी केली आहे. अनेक चर्चेला उधाण आले आहे. त्या दोघांचा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

रामनाथ गोर्डे ( वय 35, रा. धनगरगल्ली शेवगाव) मंगल अनिल अळकुटे (वय 36, रा. दहिगांव ता. शेवगाव) अशी दोघांची नावे आहेत. तर बाळू रमेश केसभट (वय 28, रा. श्रीराम कॉलनी शेवगाव) असे जखमीचे नाव आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: Nagar news two dead bodies found near Shavgaon