कॉंग्रेसला मराठवाड्यात, तर भाजपला विदर्भात यश

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

अशोक चव्हाणांनी राखला गड; प्रफुल्ल पटेलांना फटका

अशोक चव्हाणांनी राखला गड; प्रफुल्ल पटेलांना फटका
मुंबई - तिसऱ्या टप्प्यातील 21 नगर परिषदा व नगरपंचायतींच्या मतमोजणीचा निकाल जाहीर झाला असून, कॉंग्रेस पक्षाला मराठवाड्यात, तर भाजपला विदर्भात दमदार यश मिळाले आहे. कॉंग्रेस व भाजपने प्रत्येकी आठ नगराध्यक्षपदे पटकावत लक्षणीय यश मिळवताना कॉंग्रेसचा आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, तर भाजपचा सत्ताधारी मित्र शिवसेनेला साजेशी कामगिरी करता आली नाही. कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यावर एकहाती हुकूमत गाजवताना, भंडाऱ्यातील राष्ट्रवादीचे ताकदवार नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वला भाजपने शह दिला आहे. भाजप व कॉंग्रेसचे प्रत्येकी 108 उमेदवार विजयी झाले आहेत.

नगराध्यक्षपदे पुढीलप्रमाणे
जिल्हा - औरंगाबाद - खुलताबाद - एस. एम. कमर (कॉंग्रेस), कन्नड - स्वाती कोल्हे (कॉंग्रेस), पैठण - सूरज लोळगे (भाजप), गंगापूर - वंदना पाटील (युती), जिल्हा - नांदेड - उमरी - अनुराधा खांडरे (राष्ट्रवादी), धर्माबाद - अफजल बेगम (कॉंग्रेस), हदगाव - ज्योती राठोड (कॉंग्रेस), मुखेड - बाबूराव देबाडवार (कॉंग्रेस), बिलोली - मैथिली कुलकर्णी (कॉंग्रेस), कंधार - शोभा नलगे (कॉंग्रेस), कुंडलवाडी - (भाजप), मुदखेड - (अपक्ष), देगलूर - (कॉंग्रेस), नगरपंचायत - अर्धापूर - (विकास आघाडी),
माहूर - (राष्ट्रवादी कॉंग्रेस),

जिल्हा - भंडारा - तुमसर - प्रदीप पडोळे (भाजप), पवनी - (भाजप), भंडारा - (भाजप), साकोली - धनवंता राऊत (भाजप),

जिल्हा - गडचिरोली - गडचिरोली - योगिता पिपरे (भाजप), देसाईगंज - नगराध्यक्ष - शालू दंडवते (भाजप)

एकूण उमेदवार - 409
कॉंग्रेस - 108
भाजप - 108
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 77
शिवसेना - 38

Web Title: nagarpanchyat election result mumbai