नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी 27 जानेवारीला मतदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

मुंबई - कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगर परिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगर परिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. सहारिया यांनी सांगितले की, 2 ते 9 जानेवारी 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारली जातील.

नामनिर्देशनपत्रांची 10 जानेवारी 2019 रोजी छाननी होईल. मतदान 27 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 28 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

Web Title: Nagarparishad and Nagarpanchyat Election