नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 7 डबे घसरले; जिवीतहानी नाही

Duranto Express
Duranto Express

कल्याण : मुंबईकडे जाणाऱ्या नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 7 डबे आज (मंगळवार) सकाळी कसारा घाटात आसनगावजवळ घसरले. या अपघातात जिवीतहानी झाली नसून, पाच जण जखमी आहेत.

आसनगाव-वाशिंद रेल्वेस्थानकादरम्यान रुळावर पावसामुळे दगड-माती आल्याने सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला. जोरदार पाऊस आणि धुक्यामुळे चालकाला अंदाज आला नाही. चालकानं प्रसंगावधान दाखवून लगेच ब्रेक लावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. इंजिनसह 7 डबे रुळावरुन घसरले आहेत. यामुळे मुंबईकडे येणारी अप आणि-डाऊन मार्गावरील  रेल्वेवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. 

दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने मुंबईकड़े जाणारी रेल्वे वाहतुक ठप्प झाली असून, मनमाडहून सूटणारी मनमाड-लोकमान्य टिळक गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात अाली आहे. तर, नागपुर-मुंबई सेवाग्राम व जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसला मनमाड स्थानकावर थांबविण्यात आले आहे. मुंबईकड़े जाणाऱ्या प्रवासी गाड्या दौंडमार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मनमाडवरुन सुटणाऱ्या पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेस इगतपुरीवरुन परत पाठविण्यात आल्या. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने चाकरमानी व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. 

सकाळी साडेसहापासून वाहतूक ठप्प झाल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. घसरलेले डबे हटविण्यासाठी रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, आज दिवसभर वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता आहे. कल्याण टिटवाळ्या दरम्यान कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसची व्यवस्था केल्याची माहिती व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली.

रेल्वे प्रशासनाकडून सीएसटीएम 22694040, ठाणे 25334840, कल्याण 2311499 हे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com