राज्य महिला आयोगाची नायर रुग्णालयाला नोटीस

Payal-Tadvi
Payal-Tadvi

मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांना नोटीस पाठवून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

डॉ. पायल यांनी 22 मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघींविरुद्ध आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅगिंगमुळे डॉ. पायल यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्‍टर्स (मार्ड) या संघटनेने संशयित तिन्ही महिला डॉक्‍टरांचे सभासदत्व रद्द केले आहे. महिला आयोगाने कठोर शब्दांत नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातांना खडावसले आहे. विद्यार्थी आणि वरिष्ठ डॉक्‍टर यांच्यात संवादच नाही. त्याचबरोबर आपल्या रुग्णालयात रॅगिंगविरोधी कायद्याची अंमलबजावणी होते का, असा प्रश्‍नही आयोगाने विचारला. डॉ. पायल आत्महत्येप्रकरणी कार्यवाहीचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देशही महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. मंजूषा मोळवणे यांनी रुग्णालयाला दिले आहेत.

समितीचा अहवाल आज?
डॉ. पायल आत्महत्येप्रकरणी तपास करण्यासाठी रुग्णालयाने स्थापन केलेल्या रॅगिंगविरोधी समितीचा अहवाल उद्या (ता. 28) सादर केला जाण्याची शक्‍यता आहे. या समितीत 21 जणांचा समावेश आहे. हा अहवाल भारतीय वैद्यक परिषद, महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान विद्यापीठ आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय या संस्थांना दिला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com