दिलासादायक! डायलिसिस रुग्णांसाठी देवदुत ठरले नायरचे डॉक्टर्स 

दिलासादायक! डायलिसिस रुग्णांसाठी देवदुत ठरले नायरचे डॉक्टर्स 

मुंबई पालिकेच्या नायर रुग्णालयातून आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. किडनीचे कार्य नीट न चालणाऱ्या रुग्णांना वारंवार डायलिसिसची गरज भासते. अश्यातच सर्व रुग्णालये कोविड 19 च्या रुग्णांनी भरलेली असताना डायलिसिस रुग्णांनी कुठे जावं ? हा देखील प्रश्न आहे. मात्र, या सर्व परिस्थितीवर मात करत नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनाबाधित आणि किडनीची समस्या असणाऱ्या आतापर्यंत तब्बल 160 रुग्णांचे यशस्वीरित्या डायलिसिस केले आहे. 

एप्रिल महिन्यात पालिकेचे नायर रुग्णालय हे संपुर्णपणे कोविड रुग्णांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे, सर्व कोरोनाबाधित रुग्ण या रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यानुसार, 18 एप्रिलपासून आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांचे यशस्वीपणे डायलिसिस करण्यास नायर रुग्णालयाला यश आले आहे. कोविड रुग्णांचा संसर्ग आणखी तीव्र होऊ नये आणि त्यांची प्रकृती ढासळू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. 

संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी- 

डायलिसिस यूनिट अर्थात एकेडी म्हणजेच आर्टिफिशीयल किडनी डिव्हिजनची आयसीयूप्रमाणे काळजी घेतली जाते. जे डॉक्टर्स या यूनिटमध्ये जातात त्यांना पीपीई किट्स आणि सर्व सुरक्षात्मक सुविधा देऊनच आत सोडले जाते. रुग्णांच्या बेडसमध्येही अंतर ठेवले जाते. डायलिसिससाठी वापरण्यात येणारी सर्व यंत्रसामुग्री आणि सामानावर (बायोमेडीकल वेस्ट) कोविडचा जंतू राहण्याची शक्यता असते. त्यामूळे, त्यांना प्राधान्याने स्वच्छ करावं लागतं, यासाठी चतुर्थ श्रेणी कामगारांची सर्वात महत्वाची भूमिका असते. त्यानंतर, टेक्निशियन या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतात. 

काय आहे व्यवस्था ? 

एखादा कोविड रुग्ण ज्या वेळेस डायलिसिससाठी येतो तेव्हा आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस करावं लागतं. 9 मशीन्स, 3 शिफ्टमध्ये दिवसाला 27 डायलिसिसचे सेशन्स केले जाऊ शकतात. मात्र आता 25 सेशन्स केले जातात. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार, डायलिसिस केले जाते. कोरोना संक्रमित रुग्णांना 9 ते 20 दिवस रुग्णालयात दाखल करुन घेतले जाते. ज्यांना वारंवार डायलिसिसची गरज पडते. आतापर्यंत डायलिसिसचे 1100 एच डी सेशन्स झाले आहेत. 

या प्रक्रियेत सर्वांची समान भूमिका आणि श्रेय आहे. कारण पीपीई कीट्स घालुन सतत काम करणं हे शक्य होत नाही. त्यामूळे, डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन, निवासी डॉक्टर्स, सिनीयर्स डॉक्टर्स आणि चतुर्थ श्रेणी कामगार या सर्वांचा समावेश असतो. सोशल डीस्टस्टींग पाळूनच ही प्रक्रिया केली जात आहे. दर दिवशी 2 ते 5 नवीन डायलिसिससाठी रुग्ण दाखल होत आहे. - डॉ. कल्पना मेहता, नेफ्रोलॉजी विभाग, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख , नायर रुग्णालय

रुग्णालयातून रुग्णांना त्यांच्या घरी सोडणे हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. सर्वांनी मिळुन घेतलेल्या मेहनतीमुळे हे सर्व शक्य होत असुन बरेच रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. -  मोहन जोशी, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

nair hospital is treating dialysis patients amid corona virus read special report 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com