नालासोपाराप्रकरणी चौथा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ने अटक केली. श्रीकांत पांगरकर असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात अटक केलेला हा चौथा आरोपी आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. एटीएसने गेल्या आठवड्यात नालासोपारा येथे कारवाई करून वैभव राऊत, शरद कळसकर यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर सुधन्वा गोंधळेकरला अट झाली होती. त्यांच्याकडून जालन्यातील श्रीकांतचे नाव उघड झाले असून एटीएसने त्याला अटक केली. 

Web Title: Nala Sopara Explosives case Fourth arrested