नालासोपाऱ्यात दिराकडून भावजयीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

नालासोपारा - नालासोपाऱ्यात दिराने भावजयीचा खून केल्याची घटना सोमवारी (ता. 16) सकाळी घडली. निखत नदिम शेख (वय 26) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी सलमान शेख याच्याविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

डांगेवाडी येथील नसीम अपार्टमेंटमध्ये निखत शेख ही कुटुंबासह राहत होती. सकाळी 11.30 वाजता तिचा मृतदेह इमारतीच्या गॅलरीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. खून करून आरोपी सलमान हा फरारी झाला आहे. याबाबत माहिती मिळताच नालासोपाऱ्याचे पोलिस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड, अपर पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. भावांमधील कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचा पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. याबाबत नालासोपारा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. निखतच्या नातेवाइकांनी हा खून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. 

निखत शेख गर्भवती? 
निखत शेख हिचा सासू, दीर आणि नवऱ्याकडून हुंड्यासाठी छळ सुरू होता. 2014 मध्ये निखत हिचा निकाह झाला होता. तिला एक मुलगी आहे. आता ती दोन महिन्यांची गर्भवती होती. हुंड्यासाठीच तिचा खून झाला आहे, असा आरोप निखतचा भाऊ मौसिन, बहीण रुबिना यांनी केला आहे. दिराने यापूर्वीही तिला मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Nala Sopara news murder case

टॅग्स