मुंबईकर नाल्यात काय कचरा टाकतात?

हेच ठरतय पूराचे कारण
Nala waste is the cause of floods in Mumbai
Nala waste is the cause of floods in Mumbai

मुंबई - मुंबईत दरवर्षीच्या पावसाळ्यात एक अनुभव येतो तो म्हणजे साचलेल्या पाण्यातून चालण्याचा. अतिवृष्टी काळात अनेक सखल भागात पाणी साचल्याने कंबरे एवढ्या पाण्यातून चालण्याचा अनुभव सर्वसामान्यांनाच येतो. अतिवृष्टी आणि भरती अशी वेळ जुळून आल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचा अनुभव आल्यापासून राहत नाही.

शहरातील पर्जन्यमानाचा टक्का, अनेक ठिकाणचे सखल भाग, पर्जन्यवाहिन्यांच्या क्षमतेची मर्यादा आणि किमान तासाच कमाल पाऊस असे अनेक घटक हे शहरात पाणी साचण्यासाठी कारणीभूत ठरतात. पण आणखी एक मानवी कृती जबाबदार ठरते ती म्हणजे नाल्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची. या नाल्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यालाच फ्लोटिंग मटेरिअल असे म्हणतात.

सगळ्या मुंबईतील नाले, नद्यांचा प्रवाह यामधून हे फ्लोटिंग मटेरिअल वाहत अखेर समुद्राच्या दिशेने प्रवास करते. पण हेच फ्लोटिंग मटेरिअल कारण ठरते ते शहरातील पाण्याचा निचरा विनाअडथळा न होण्यासाठीचे. मुंबईकर नाल्यामध्ये काय काय टाकतात हा त्यामुळेच खरा संशोधनाचा विषय आहे. मुंबईकरांच्या या कचरा टाकण्याच्या सवयीला नियंत्रित करताना एकीकडे सामाजिक स्तरावर उपक्रम हे झोपडपट्टी भागात राबविले जातात. तर दुसरीकडे हाच समुद्राच्या दिशेने आलेले कचरा बाहेर काढण्यासाठी पालिकेची मोठी यंत्रणा कामाला लागते.

नाल्यातील कचऱ्यात काय काय आढळते ?

मुंबईतील समुद्राच्या दिशेने वाहून येणाऱ्या कचऱ्यात गादी, उशा, प्लॅस्टिकच्या बॉटल्स, रॅपर्स, पिशव्या, फ्रिजचा थर्माकॉलचा बॉक्स, कपडे, चादरी अशा अनेक प्रकारचा कचरा हा दरदिवस अनेक टनांमध्ये दररोज येऊन समुद्राच्या आधीच्या फ्लड गेट्सला आदळतो. हा सगळा कचरा जाळीने अडवून सध्या मॅन्युअल पद्धतीने माणसांचा वापर करून काढण्यात येतो.

संपूर्ण शहरातून वाहून आलेला कचरा हा वरळीच्या लव्ह ग्रुव्ह पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी काढण्यात येतो. दररोज दोन टन इतका कचरा मॅन्युअल पद्धतीने काढण्यात येतो. लोकांनी थेट नाल्यात टाकलेला हा सगळा कचरा काढण्यासाठी पालिकेची मोठी यंत्रणा कामी लागते. त्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना नाल्यात उतरून हा कचरा ढकलून बाहेर काढण्यासाठीचेही काम करावे लागते. अतिशय अमानवीय अशा परिस्थितीत हा नाल्याच्या पाण्यात उतरून काम करण्याशिवाय या कर्मचाऱ्यांसमोरही पर्याय नसतो. फक्त मुंबईकरांनी टाकलेला कचरा बाहेर काढण्यासाठी आपल्या तुमच्यासारखीच माणस राबतात फक्त दुसऱ्यांनी टाकलेला कचरा टाकण्यासाठी.

एक पाऊल मुंबईसाठी

मुंबईकर जबाबदारीने वागले तर शहरात कार्यरत असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेचा कामाचा ताण कमी होण्यासाठी मदत होईल. कचऱ्यातून वाहून येणारे मटेरिअल पाहता ही बेजबाबदार वागण्याची वृत्ती शहरासाठी संकट ठरत आहे. त्यामुळे आपणच शहर तुंबण्यासाठी बेशिस्त वागल्याने एक मानवनिर्मिती संकट ओढावून घेत आहोत. त्यासाठीच मुंबईकरांनी मानसिकता बदल करणे गरजेचे ठरणार आहे.

मुंबईतील स्थानिक लोकप्रतिनिधींसोबतच नागरिकांचे योगदान यासाठी महत्वाचे ठरू शकते. म्हणूनच नाल्यात कचरा न टाकणे हेच मुंबईसारख्या शहरावरील संकट टाळण्याचा आगामी काळातील एक उपाय ठरू शकते. त्यामुळे नाल्यात कचरा न टाकण्याचा निर्धार करण्याचे एक पाऊल टाकणे ही गरज असल्याची प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेचे पायाभूत सुविधा प्रकल्प विभागाचे उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.

नाल्यातील कचरा उचलण्यासाठी टर्कीचे तंत्रज्ञान

राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) ने समुद्रात शहरातील कचरा टाकू नका असे आदेश दिले आहेत. त्यामुळेच कचरा रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून आतापर्यंत मॅन्युअल पद्धतीने हा कचरा काढण्यात येत होता. पण आता मुंबई महापालिका फ्लड गेट्सच्या आधी बॅक रेक स्क्रिन लावत आहे. या पद्धतीमुळे समुद्राकडे वाहून येणारा कचरा हा मशीनच्या माध्यमातून पाण्यातून वर उचलला जाईल. त्यानंतर कन्वेयर बेल्टवरून हा कचरा पुढे ट्रकमध्ये भरून डंपिंग ग्राऊंडवर टाकला जाईल.

यासाठी टर्कीत वापरलेले तंत्रज्ञान हे आशियात पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिका वापरणार आहे. या बॅक रेक स्क्रिनच्या प्रत्येक दात्याची २ टन कचरा उचलण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकुण सहा स्क्रिनच्या माध्यमातून दिवसाला १० टन कचरा बाहेर काढणे शक्य होईल. कोणत्याही मनुष्यबळाचा वापर नाल्यात न करता हा कचरा काढण्यात येणार आहे. वरळीसारखेच बॅक रेक स्क्रिन हे इर्ला (विले पार्ले) येथील नाल्यातही लावण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्रात जाणारा कचरा हा आधीच ट्रॅप करणे शक्य होईल.

या मशीनसाठी २० कोटी रूपयांचा खर्च मुंबई महानगरपालिकेला येणार आहे. ही कोट्यावधी रूपयांची खर्च करण्याची वेळ ही केवळ मुंबईकरांच्या नाल्यात कचरा टाकण्याच्या सवयीमुळेच आली आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे मुंबई तुंबण्यापासून थांबवण्यासाठी आपणही कुठेतरी पाऊल उचलण ही आता काळासोबतच शहराची गरज आहे हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com