उल्हासनगरातील नालेसफाईला युद्धपातळीवर सुरवात

दिनेश गोगी
शनिवार, 19 मे 2018

उल्हासनगर - प्रथम जारी केलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे ई-टेंडरिंग द्वारे पुन्हा निविदा प्रक्रिया हाताळल्यावर स्थायी समितीने काल सायंकाळी त्याला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे उल्हासनगरातील नालेसफाईला आजपासून युद्धपातळीवर सुरवात झाली आहे. त्यासाठी 4 पोकलन, 2 जेसीबी, 8 डंपर तैनात करण्यात आले असून 10 हजार हंगामी कामगार जुंपले आहेत.

महापौर मिना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांच्या हस्ते मोठे नालेसफाई करणाऱ्या पोकलन मशीनची पूजा करण्यात आली आहे. यावेळेस माजी आमदार कुमार आयलानी,सभागृह नेते जमनादास पुरस्वानी, नगरसेवक डॉ.प्रकाश नाथानी, महेश सुखरामानी, माजी नगरसेवक बच्चाराम रुपचंदानी, अशोक ठाकूर, पालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार उपस्थित होते.

मुळात फेब्रुवारी मार्चमध्ये पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईची प्रक्रिया निविदाद्वारे हाताळली जाते. मात्र यावेळेस प्रतिसाद मिळाला नसल्याने पुन्हा इटेंडरिंग द्वारे निविदा मागवण्यात आल्या. यावेळी शशांक मिश्रा यांच्या शुभम कन्ट्रक्शन कंपनीला नालेसफाईचे कंत्राट मिळाले. 

शहरात कुठेही पुराचे पाणी तुंबता कामा नये यासाठी वालधुनी नदी सह 46 मोठया नाल्यांची सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. सोबतच 10 हजार हंगामी कामगारांकरवी लहान नाल्यांची सफाई करण्यात येणार असल्याचे शशांक मिश्रा यांनी सांगितले. वर्षातून तिनदा नालेसफाई केली जाते. त्यामुळे उल्हासनगरात पूरपरिस्थिती ओढवणार नाही. असा विश्वास मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी व्यक्त केला.

Web Title: Nalasefai in Ulhasnagar starts