नालासोपारा बनावट चकमक प्रकरण 

नालासोपारा बनावट चकमक प्रकरण 

मुंबई : नालासोपारा येथे पोलिस चकमकीत मरण पावलेल्या जोगिंदर राणा याला खोट्या चकमकीत मारल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी दुपारी राणा याला चकमकीत ठार केले होते. याप्रकरणी दाखल याचिकेवर सीआयडी चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत राणावर लावलेल्या आरोपांबाबत न्यायालयीन चौकशीचे आदेश देत वसई दंडाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. 

जोगिंदर गोपाल राणा याची 23 जुलैला पोलिस चकमकीत हत्या झाली. राणा हा सराईत गुंड होता. त्याच्यावर वांद्रे, खार, सांताक्रूझ, जुहू, कांदिवली आणि अर्नाळा पोलिस ठाण्यात 37 गुन्हे दाखल होते. त्यात चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांचा समावेश होता. त्यातील बहुतांश गुन्ह्यांत तो शिक्षा भोगून आला होता. त्याला खोट्या चकमकीत ठार मारल्याचा आरोप जोगिंदर राणा याचा भाऊ सोनू राणा याने करत, ऍड. दत्ता माने यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनोज सकपाळ आणि मंगेश चव्हाण या दोघांवर हत्येचा आरोप नोंदवावा; यांच्यासोबतच त्यांचे व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मोबाईल लोकेशन रेकॉर्ड आणि सीडीआर रिपोर्ट तपासावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

आरोप खोटे असल्याचा कुटुंबीयांचा दावा 
राणाने पोलिस हवालदारावर चाकूने हल्ला केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तरीही चाकूला रक्त लागले नव्हते, की घटनास्थळीही रक्‍ताचे डाग का आढळून आले नाहीत, असा प्रश्‍न सोनू यांनी केला आहे. हल्ल्यात पोलिस हवालदार मनोज सकपाळ जखमी होऊन अतिदक्षता विभागात दाखल असल्याचे पोलिस सांगतात; मात्र सकपाळ छायाचित्रात घटनास्थळी उभे असल्याचे दिसत आहे, असे सोनू यांनी सांगितले. राणाने गुन्हेगारीविश्‍व सोडले होते आणि तो चालक म्हणून काम करत होता. मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ हे दोघे राणाचा मृतदेह रिक्षातून नेतानाचे छायाचित्रही पुरावा म्हणून सादर केल्याचे ऍड. दत्ता माने यांनी सांगितले. त्यावर पुढील सुनावणी 10 डिसेंबरपर्यंत तहकूब केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com