नालासोपाऱ्याच्या अपहृत मुलीची गुजरातमध्ये हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

नालासोपारा - नालासोपाऱ्यातून शनिवारी अपहरण झालेल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. तिचा मृतदेह गुजरातमधील नवसारी रेल्वे स्थानकाच्या महिला स्वच्छतागृहात सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलीला घेऊन जाताना अनोळखी महिला सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या महिलेचे रेखाचित्र जारी करण्यात आले असून, तिचा शोध घेण्यासाठी तुळींज पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.

अंजली संतोष सरोज (वय 6) असे मृत मुलीचे नाव आहे. ती नालासोपाऱ्यातील विजयनगर परिसरातील साई अर्पण अपार्टमेंटमध्ये आजी-आजोबांसोबत राहत होती. येथील लोकमान्य शाळेत ती पहिलीत शिकत होती. शनिवारी सायंकाळी मैत्रिणींसोबत खेळत असताना अनोळखी महिलेने तिला खाऊचे आमिष दाखवले. त्यानंतर रात्री 8 वाजता त्या महिलेने अंजली हिला हाताला धरून ओढत नेले. हे दृश्‍य या परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. बराच वेळ मुलगी घरी न परतल्याने घरच्यांनी तिचा शोध घेतला; मात्र ती कुठेच न सापडल्याने तुळींज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीतील चित्रणावरून अनोळखी महिलेचा शोध घेतला. रविवारी सायंकाळी अंजलीचा मृतदेह नवसारी रेल्वे स्थानकाच्या महिला स्वच्छतागृहात सापडल्याने तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी परिसरातील नागरिकांचे जबाब घेऊन तपासाला सुरवात केली आहे.

Web Title: nalasopara girl murder