वसईत मोटारमनमुळे विद्यार्थ्याचा जीव वाचला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नालासोपारा - मोटारमनच्या प्रसंगावधानामुळे आज एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जीव वाचला.

नालासोपारा - मोटारमनच्या प्रसंगावधानामुळे आज एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जीव वाचला.

भाईंदर येथे राहणारा वाजिद शेख हा सोमवारी मित्रांबरोबर भाईंदरहून वसईला जात होता. सायंकाळी 5.30 वाजता त्याने वसईहून भाईंदरला जाणारी लोकल पकडली. वसई आणि नायगावदरम्यान वाजिदचा हात लोखंडी खांबाला लागला आणि तो धावत्या लोकलमधून रुळांवर पडला. लोकल निघून गेली; मात्र भाईंदरहून विरारला जाणाऱ्या लोकलच्या मोटारमनने वाजिदला जखमी अवस्थेत पाहिले. त्याने लोकल थांबवून वाजिदला उचलून लोकलमध्ये घेतले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. वाजिदचा डाव्या हाताला दुखापत झाली आहे. वेळीच उपचार मिळाल्याने वाजिदचे प्राण वाचले.

Web Title: nalasopara mumbai news student life saving by motorman