विरारमध्ये अंधश्रद्धेचा बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

11 वर्षांच्या मुलीची हत्या; आई-वडिलांसह मावशीला अटक
नालासोपारा - वैद्यकीय उपचाराऐवजी अंधश्रद्धेतून अघोरी प्रकार करून 11 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह मावशीला अटक केली.

11 वर्षांच्या मुलीची हत्या; आई-वडिलांसह मावशीला अटक
नालासोपारा - वैद्यकीय उपचाराऐवजी अंधश्रद्धेतून अघोरी प्रकार करून 11 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह मावशीला अटक केली.

सानिया भेकरे असे मृत मुलीचे नाव आहे. वडील अंबाजी भेकरे, आई मीनाक्षी आणि मावशी माधुरी शिंदे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. विरार पूर्वेतील मनवेलपाडा गावातील एका इमारतीत कुटुंब राहते. अंबाजी मुंबईत खासगी हॉटेलमध्ये नोकरी करत होता. त्याची मुलगी सानिया हिला 15 दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होता; मात्र वैद्यकीय उपचारानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.

शनिवारी (ता. 17) रात्री 12 वाजता आई मीनाक्षी हिने आपल्या अंगात आल्याचे सांगत मीच सानियावर उपचार करणार, असे म्हणून तिला आघोरी पद्धतीने कवटाळले. या वेळी अंबाजी, त्याचा 14 वर्षांचा मुलगा यश आणि माधुरी घटनास्थळी होते. थोड्याच वेळात मीनाक्षीने सानियाला जमिनीवर पाडले आणि तिच्या पोटावर बसली. त्याचवेळी माधुरीने सानियाचे पाय धरले. त्यानंतर मीनाक्षीने सानियाच्या तोंडात आणि गुप्तांगात हात घालून आघोरी प्रकार सुरू केला. त्यामुळे सानियाचा गुदमरून मृत्यू झाला.

मात्र, काहीच घडलेले नसल्याचे भासवत मीनाक्षी आणि अंबाजीने मृत सानियाला रविवारी विरार येथील संजीवनी रुग्णालयात नेले. डॉक्‍टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. जेजे रुग्णालयात सानियाचे शवविच्छेदन झाले. तोंड आणि गुप्तांगातील जखमांवरून तिची हत्या झाल्याचा संशय डॉक्‍टरांनी व्यक्त केला. सानियावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित मीनाक्षी आणि अंबाजीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली.

Web Title: nalasopara mumbai news Victor is the victim of superstition