प्रदीप शर्मा यांचा राजकीय एन्काऊंटर ? Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

नालासोपारा विधानसभा निवडणुकीत एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेने तर्फे निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्या नंतर त्यांनी येथील वातावरण चांगलेच तापवले होते निवडणुकीच्या प्ररचारात दादागिरी, गोळ्या घालणे यासह एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये असताना आपल्याला केलेली मदत अशी अनेक वक्तव्य करून प्रदीप शर्मा यांनी धमाल उडवून दिली होती त्यामुळे निवडणुकीत एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजकारण्यांचा एन्काऊंटर करतात की राजकारणी पोलिसांचा गेम करतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते या लढाईत कसलेल्या हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र आमदार क्षितिज ठाकूर या राजकारण्यांनी एन्काऊंटर स्पेशाल

नालासोपारा विधानसभा निवडणुकीत एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेने तर्फे निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्या नंतर त्यांनी येथील वातावरण चांगलेच तापवले होते निवडणुकीच्या प्ररचारात दादागिरी, गोळ्या घालणे यासह एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये असताना आपल्याला केलेली मदत अशी अनेक वक्तव्य करून प्रदीप शर्मा यांनी धमाल उडवून दिली होती त्यामुळे निवडणुकीत एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजकारण्यांचा एन्काऊंटर करतात की राजकारणी पोलिसांचा गेम करतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते या लढाईत कसलेल्या हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र आमदार क्षितिज ठाकूर या राजकारण्यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्टचाच एन्काऊंटर केल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

शिवसेनेने यंदाच्या निवडणुकीत नालासोपारा साठी मास्टरप्लान तयार केलेला. शिवसेनेने ‘चकमक फेम’ पोलिस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. प्रदीप शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून शिवसेनेने मोठ्या प्रमाणातील उत्तर भारतीय मतांवर डोळा ठेवलाय. प्रदीप शर्मा हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असल्याने एक क्लिन आणि सक्षम उमेदवार अशी त्यांची चछबी आहे. प्रदीप शर्मा यांना सेनेतील मोठ्या नेत्यांचंही पाठबळ आहे. दरम्यान शर्मा हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांनी कोणतीही विकासकामे केलेली नाहीत.

क्षितिज ठाकूर हे हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव. 2009 आणि 2014 क्षितिज ठाकूर यांनी दोनदा नालासोपारा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. क्षितिज ठाकूर
बलस्थाने उच्चशिक्षित, विकासाचे व्हिजन असलेला युवक नेता म्हणून परिचित आहेत. पण क्षितिज ठाकूर यांना नालासोपाऱ्यात दरवर्षी पावसात साठणारे पाणी आणि मतदारसंघातील बेकायदा बांधकामांचा प्रश्न या मुद्द्यांवरून घेरण्यात आलं.  

दरम्यान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडेबाजी झालेली पाहायला मिळाली. प्रदीप शर्मा पैसे वाटत फिरत असल्याच्या संशयावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या गाड्या अडवून, त्या तपासण्याची मागणी केली. संतप्त कार्यकर्त्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करावा लागला.

नालासोपारा आणि चोर पोलीस वाद

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. नालासोपाऱ्यात 'चोर की पोलीस?' असं लिहिलेल्या पोस्टरमुळे वातावरण तापलं होतं. गेल्या 30 वर्षांपासूनच्या कुशासन चालवणाऱ्या लोकांचा आता अस्त होणार आहे. परिसरात लागलेले बॅनर्स योग्य आहेत, अशी प्रतिक्रिया प्रदीप शर्मा यांनी दिली आहे.

Webtitle : nalasopara vidhansabha constetuency afternoon trends 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nalasopara vidhansabha constetuency afternoon trends