esakal | बाळासाहेबांकडूनच संभाजीनगर नामकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बाळासाहेबांकडूनच संभाजीनगर नामकरण : सुभाष देसाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख (ShivSena chief) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी औरंगाबाद (Aurangabad) शहराला संभाजीनगर (Sambhajinagar) नाव दिलेलेच आहे. यामुळे हे नाव वापरण्यासाठी आणखी कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

सुभाष देसाई शुक्रवार औरंगाबाद येथे आले होते. त्यांच्या लेटरपॅडवर गुरूवारी आलेल्या दौऱ्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनात दहा वेळा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता. याबाबत ते म्हणाले, की संभाजीनगर नावाशी आमची बांधिलकी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच या शहराला संभाजीनगर नाव दिलेले आहे. यामुळे हे नाव वापरण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही

हेही वाचा: नागपूर : गोरेवाड्यात आता ‘टॉकिंग ट्री‘

कागदोपत्री आणि सरकार दरबारी जी प्रक्रिया होणे आवश्यक आहे, ती होत राहील. मात्र, आता लोकांनीच संभाजीनगर नाव वापरण्यास सुरूवात केली आहे.

- सुभाष देसाई, पालकमंत्री, औरंगाबाद

loading image
go to top