नाणारला कॉंग्रेसची जाहीर सभा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

मुंबई - शिवसेना, मनसे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्पाला विरोध केल्यानंतर आता कॉंग्रेसदेखील सरकारविरोधात मैदानात उतरणार आहे. दोन मे रोजी नाणार येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या वेळी कॉंग्रेसचे नाणार प्रकल्पवासीयांची भेट घेणार असून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देणार आहेत. नारायण राणे यांनी कॉंग्रेसला रामराम केल्यानंतर पहिल्यांदाच कॉंग्रेस कोकणात शक्‍तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. या सभेला दिल्लीहून राष्ट्रीय नेतेदेखील येतील, असा दावा करण्यात आला आहे.
Web Title: nanar congress meeting