‘नाणार’मधील जमीन संपादनाला स्थगिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई - कोकणातील नाणार येथील प्रस्तावित तेल रिफायनरी प्रकल्प रद्द करा, या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत नाणार येथील जमीन अधिग्रहणाला स्थगिती दिली असल्याची घोषणा केली. यासंदर्भात स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आल्यास पोलिसांनी त्यांची दखल घ्यावी असे निर्देशही देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत नाणारचा विषय काढत शिवसेना आणि सरकारवर निशाणा साधला. ‘नाणारवरून शिवसेनेचे मंत्री राजीनामा द्यायला निघाले होते. उद्योगमंत्र्यांनी नाणारची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली होती. या घोषणेचे काय झाले, असा प्रश्‍न करीत यांचे राजीनामे शरयू नदीत वाहून तर गेले नाही ना, असा टोला लगावत नाणार होणार नाही, असे एका पक्षाचे प्रमुख सांगतात,’ अशा शब्दांत विखे पाटील यांनी शिवसेनेला डिवचले. दरम्यान, प्रेक्षक गॅलरीत उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी ‘नाणार प्रकल्प रद्द करा...’ अशा घोषणा विधानसभेत आणि सभागृहाबाहेर दिल्या.

Web Title: Nanar Project Land Acquisition Stop Devendra fadnavis