'नाणार'च्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मुंबई सेंट्रल येथील "कॉमर्स सेंटर'मधील या प्रकल्पाच्या कार्यालयात तोडफोड केली. या प्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्याचे पथक तपास करत आहेत.

या प्रकल्पास विरोध असलेल्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी रविवारी (ता. 15) मुलुंडमध्ये झालेल्या सभेत दिला होता. या पार्श्‍वभूमीवर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मनसेचे सहा कार्यकर्ते कॉमर्स सेंटरमधील या प्रकल्पाच्या कार्यालयात घुसले. त्यांनी तेथील फर्निचर आणि काचेच्या दरवाजाची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याआधारे पोलिस तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: nanar project office damage by MNS