नारायण राणे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दलची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या चेंबूरमधील कट्टर समर्थक माजी नगरसेविका निकम डोळस यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. डोळस यांचा शिवसेना प्रवेश हा राणे यांच्यासाठी धक्का मानला जातोय. 

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दलची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या चेंबूरमधील कट्टर समर्थक माजी नगरसेविका निकम डोळस यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. डोळस यांचा शिवसेना प्रवेश हा राणे यांच्यासाठी धक्का मानला जातोय. 

नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असले तरी त्यांच्या कट्टर समर्थक निलम डोळस यांनी आज शिवसेना भवन येथे उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला. डोळस यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नारायण राणेंना मोठा धक्का असल्याचं बोललं जातं आहे. डोळस यांच्यासह ईशान्य मुंबईचे प्रमुख कार्यकर्ते हरीश विचारे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. तर ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे.

मुरबाड तालुक्यातील माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सु़भाष पवार यांनी आज जिल्हा परिषदेचे आठ सदस्य आणि सभापती बाजार समिती, सभापती कल्याण पंचायत समिती सभापती यांच्या समवेत शिवसेनेत प्रवेश केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane supporters join Shiv Sena