खबरींकडून माहिती समजताच NCB ने रचला सापळा, अग्निशमनदलाचे दोन कर्मचारी अडकले जाळ्यात

खबरींकडून माहिती समजताच NCB ने रचला सापळा, अग्निशमनदलाचे दोन कर्मचारी अडकले जाळ्यात

मुंबई : नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून मुंबईत ड्रग्स प्रकरणात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येतायत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर NCB ने मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवत अनेक पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार देखील NCB च्या रडारवर आहेत. अनेक बड्या अभिनेत्र्या सोबतच अभिनेत्यांची NCB  ने चौकशी देखील केलीये. अशाच प्रकारची धडक कारवाई पुढे नेत नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने आता ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईतून एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मुंबईतील डोंगरी भागात NCB ने कारवाई केली आहे. 

नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने कारवाई करत अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. NCB ला त्यांच्या सूत्रांकडून या ड्रग्स तस्करीची माहिती समजली होती. त्यानंतर त्यांनी सापळा रचून धाडसत्र राबवलं. या धाडीमध्ये नार्कोटिक कंट्रोल ब्युरोला दोघांकडून MD ड्रग्स आढळून आले आहेत. दरम्यान, आता या ड्रग्स प्रकरणाची पाळमुळं कुठवर गेली आहेत याचा तपास नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून सुरू आहे.

नायजेरियन तस्करांच्याही आवळल्या मुसक्या 

काल देखील मुंबईमध्ये NCB ने कारवाई करत जुहूमधल्या जे डब्ल्यू मॅरियेट हॉटेलसमोरून नायजेरियन नागरिकांना अटक केलेली. NCB च्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. या दोघांकडून कोकेन आणि MD ड्रग्स हस्तगत करण्यात आले. या दोघांकडून 500 ग्रॅम एमडी, गोळ्यांच्या माध्यमातून कोकेन आणि चरसची देखील विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे या प्रकरणात काही हायप्रोफाइल व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय NCB ला आहे. पोलिसांच्या भीतीने आणि गोळ्या लपवण्यासाठी या नायजेरियन व्याक्तीने सर्वांच्या सर्व गोळ्या गिळून त्या लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मेडिकलकरून या नायजेरियन तस्करांच्या पोटातून १२ कॅप्सूल्स काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

Narcotic control bureau arrested two men from firefighting department

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com