मंत्री नवाब मलिक यांच्या मुलीच्या घरी NCBचा छापा, जावयाला अटक

पूजा विचारे
Thursday, 14 January 2021

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरावर गुरुवारी सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकानं छापा टाकला आहे.

मुंबईः राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरावर गुरुवारी सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकानं छापा टाकला आहे. ड्रग्स बाळगल्या प्रकरणी आज हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी एनसीबीकडून समन्स देखील बजावण्यात आला होता. दरम्यान आता एनसीबीचे अधिकारी या ठिकाणी महत्त्वाच्या पुराव्यांची झाडाझडती घेत आहे. 

बुधवारी समीर खान याला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. 200 किलो गांजा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत झालेल्या संशयित व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. 13 तासांच्या चौकशीनंतर अखेर त्याला अटक करण्यात आली.

समीर खान असे नवाब मलिक यांच्या जावयाचे नाव आहे. समीर खान यांना एनसीबीने चौकशीसाठी समन्स पाठविले होते. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानी आणि समीर यांच्यात जीपेद्वारे आलेले 20 हजार रुपयाचा व्यवहार झाला. त्याच्या पडताळणीसाठी एनसीबीने समीर खान यांना समन्स पाठवले. त्यानुसार समीर खान बुधवारी सकाळी एनसीबी कार्यालयात हजर राहिले होते.

एनसीबी सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात शनिवारी एनसीबीने करण सजनानी नावाच्या आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक केली होती. त्याच्याकडून 200 किलो गांजाही जप्त करण्यात आला होता.` त्याचप्रकरणी चौकशीदरम्यान बऱ्याच जणांची नावे समोर आली होती. सजनानीच्या खात्यातील एका संशयित व्यवहाराबाबत चौकशीत समीर खान यांच नाव असल्याचं उघड झाले.  त्यामुळे मंगळवारी (12 जानेवारी) रात्री आठच्या सुमारास एनसीबीच्या एक टीमने वांद्रे येथे जाऊन समीर खान यांना समन्स देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार समीर खान बुधवारी सकाळी साडेआठ वाजता चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांची सुमारे 13 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
जावयाला अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे. मलिक यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास आहे.

मुच्छड पानवाल्याला जामीन

दरम्यान याच प्रकरणी एनसीबीने मुंबईतील मुच्छड पानवालामधील रामकुमार तिवारीला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याची बुधवारी सुटका केली.

Narcotics Control Bureau raid Nawab Malik son in law Sameer Khan residence Bandra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narcotics Control Bureau raid Nawab Malik son in law Sameer Khan residence Bandra