NCBचं धाड सत्र सुरुच, बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी छापा

पूजा विचारे
Monday, 9 November 2020

 बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षानं ही धाड टाकली आहे.  अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीनं छापा टाकला आहे. तर अर्जुन रामपाल यांचा वाहन चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईः  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेत्याच्या घरी छापा टाकण्यात आला आहे.  बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षानं ही धाड टाकली आहे.  अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीनं छापा टाकला आहे. तर अर्जुन रामपाल यांचा वाहन चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणात अर्जुनचं नाव आल्यानं एनसीबीनं ही कारवाई केली आहे. बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीनं आपलं धाड सत्र सुरु ठेवलं आहे. 

या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले. अॅगिसिलोस हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. अॅगिसिलोस हा एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. या प्रकरणात त्याचं नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आलं होतं. न्यायालयानं त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

फिरोज यांच्या घरावर छापा 

काल सकाळी फिरोज यांच्या घरावर एनसीबीनं छापेमारी केली. यावेळी एनसीबीनं 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर एनसीबीनं नाडियाडवाला यांच्या पत्नीला अटक केली. एनसीबीनं केलेल्या कारवाईत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून एकूण 717.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ सापडले. याची किंमत 3 लाख 66 हजार 610 रुपये आहे. यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी शबाना सईद यांना त्यांच्या गुलमोहर क्रॉस रोडवरील घरातून अटक केली.

Narcotics Control Bureau raids actor Arjun Rampal Mumbai house


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narcotics Control Bureau raids actor Arjun Rampal Mumbai house