NCB कडून मुंबईत तीन ठिकाणी छापेमारी, ड्रग्स डिलर्सची दाणादाण

पूजा विचारे
Friday, 25 September 2020

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकले. त्यानंतर आज पुन्हा एकदा एनसीबीनं मुंबईत तीन ठिकाणी धाड टाकली आहे.

मुंबईः एनसीबीचं विशेष तपास पथक (एसआयटी) जे सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधीत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकले. त्यानंतर आज पुन्हा एकदा एनसीबीनं मुंबईत तीन ठिकाणी धाड टाकली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनचा मुद्दा समोर आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनसीबी करत आहे. या प्रकरणी एनसीबीनं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ही अटक केली आहे. तसंच बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींची नाव देखील समोर आली आहेत त्यांना समन्स पाठवण्यात आलेत. 

गेल्या काही दिवसांपासून एनसीबी ड्रग्स प्रकरणाचा तपास करत आहे. एनसीबीनं आज सकाळी अचानक अंधेरी आणि पवईत ही कारवाई केली आहे. यापूर्वी एनसीबीनं केलेल्या कारवाईत ड्रग्स सापडले होते.

अमली पदार्थ विरोधी पथकानं(एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. या समन्सनुसार आज रकुल प्रीत सिंहची चौकशी केली जाणार आहे.

एनसीबीच्या दोन टीम 

एनसीबीची एक टीम बी- टाऊनमधील सेलिब्रिटींची चौकशी करुन या प्रकरणाचा तपास करत आहे. तर दुसरी एनसीबीची दुसरी टीम मुंबईतील वेगवेगळ्या भागांवर छापे टाकत आहे आणि त्यातून ड्रग्स डीलरच्या मुस्क्या आवळत आहेत. सध्या रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, दिवंगत अभिनेता सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा कर्मचारी दिपेश सावंत आणि इतरांना एनसीबीने या प्रकरणात अटक केली आहे आणि त्यांची चौकशीही होत आहे.

Narcotics Control Bureau raids three different locations Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narcotics Control Bureau raids three different locations Mumbai