व्हायरल व्हिडीओ भोवला, 2019 च्या पार्टीबद्दल दिग्दर्शक करण जोहरला NCB ची नोटीस

व्हायरल व्हिडीओ भोवला, 2019 च्या पार्टीबद्दल दिग्दर्शक करण जोहरला NCB ची नोटीस

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता करण जोहरला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) नोटीस पाठवली आहे. त्याने 2019 मध्ये आयोजीत केलेल्या पार्टीबाबत वायरल झालेल्या व्हीडीओप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. NCB च्या वरिष्ठ अधिका-याने या वृत्ताला दुजोरा दिला असून बुधवारी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगितले त्याला शुक्रवारपर्यंत याप्रकरणी उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी त्याने स्वतः येणे बंधनकारक नसून त्याने कोणामार्फत उत्तर पाठवले, तरी चालेल, असे सूत्रांनी सांगितले.

शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिसरा यांनी याप्रकरणी तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली होती. सप्टेंबर महिन्यात ही तक्रार करण्यात आली होती. एनसीबीच्या मुख्यालयाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर ती तक्रार मुंबई कक्षाकडे पाठवण्यात आली होती. त्याच्या पडताळणीसाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. आम्ही याप्रकरणी नोटीस पाठवली असून तसेच याप्रकरणी कोणालाही समन्स पाठवले नसल्याचे अधिका-याने स्पष्ट केले. याप्रकणी सिसरा यांनी 25 सप्टेंबरला ट्वीट करून एनसीबी करन जोहरला नोटीस पाठवण्याची शक्यता असल्याचं सांगितले होते. पण त्यावेळी कोणतेही समन्स पाठवण्यात आले नाही.

एनसीबी सध्या बॉलीवूडमधील ड्रग्स वितरणाबाबत तपास करत असून याप्रकरणी आतापर्यंत 28 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अभिनेता अर्जून रामपालला एनसीबीने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. याशिवाय अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची चौकशी केली होती.

गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या पार्टीत करण जोहरच्या पार्टीत अनेक सेलेब्रीटी आले होते. या पार्टीत ड्रग्सचे सेवन करण्यात आल्याचा आरोप आहे. जोहरने यापूर्वीच हे आरोप फेटाळून लावत पार्टीत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे स्पष्ट केले होते.

( संपादन - सुमित बागुल )

narcotics control bureau sends notice to producer and director Karan Johar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com