अभिनेता अर्जुन रामपाल यांना NCB कडून समन्स, बुधवारी होणार चौकशी

पूजा विचारे
Monday, 9 November 2020

अभिनेता अर्जुन रामपाल यांना एनसीबीनं समन्स बजावले आहेत. अर्जुन यांना येत्या ११ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.  आज सकाळी  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला.

मुंबईः अभिनेता अर्जुन रामपाल यांना एनसीबीनं समन्स बजावले आहेत. अर्जुन यांना येत्या ११ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.  आज सकाळी  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षानं ही धाड टाकली. अर्जुन रामपाल यांचा वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. ड्रग्ज प्रकरणात अर्जुनचं नाव आल्यानं एनसीबीनं ही कारवाई केली. बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीनं आपलं धाड सत्र सुरु ठेवलं आहे. 

या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले. अॅगिसिलोस हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. अॅगिसिलोस हा एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. या प्रकरणात त्याचं नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आलं होतं. न्यायालयानं त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

फिरोज यांच्या घरावर छापा 

काल सकाळी फिरोज यांच्या घरावर एनसीबीनं छापेमारी केली. यावेळी एनसीबीनं 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर एनसीबीनं नाडियाडवाला यांच्या पत्नीला अटक केली. एनसीबीनं केलेल्या कारवाईत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून एकूण 717.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ सापडले. याची किंमत 3 लाख 66 हजार 610 रुपये आहे. यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी शबाना सईद यांना त्यांच्या गुलमोहर क्रॉस रोडवरील घरातून अटक केली.

अधिक वाचा-  विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

Narcotics Control Bureau summons actor Arjun Rampal join the investigation on 11th November


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narcotics Control Bureau summons actor Arjun Rampal join the investigation on 11th November