बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी NCBची मोठी कारवाई, कनेक्शन आहे थेट सुशांत सिंह राजपूतशी

पूजा विचारे
Tuesday, 2 February 2021

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवार याला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे.

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवार याला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे. सध्या ऋषिकेश पवारची एनसीबीकडून चौकशी  सुरु केली आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात त्याच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.   मुंबईतील चेंबुरमध्ये राहणाऱ्या ऋषिकेश पवारला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 
ऋषिकेशवर सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

ड्रग्ज प्रकरणी ऋषिकेश याचा एनसीबीकडून तपास केला जात होता. तेव्हा एका ड्रग्ज सप्लायरने ऋषिकेश याचे नाव घेतले होते. या व्यतिरिक्त दीपेश सावंत याने सुद्धा आपल्या जबाबात त्याचे नाव घेतले होते.  तेव्हा पवार हा फरार झाला होता. 

ऋषिकेशचं नाव समोर आल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी धाडही टाकली होती. तसंच ऋषिकेशची हार्ड डिस्क एनसीबी अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. दरम्यान त्याच्या घरातील लॅपटॉपमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली होती. 

फरार होता ऋषिकेश 

दीपेश सावंत तसंच एका ड्रग्ज सप्लायरने ऋषिकेशचं नाव घेतल्यानंतर एनसीबीकडून त्याचा तपास सुरु होता. पवारच्या विरोधात अनेक पुरावे देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. तसंच ऋषिकेशनं अटक टाळण्यासाठी सेशन्स कोर्टातही धाव घेतली होती. मात्र कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला. यानंतर पवार याला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावलं होतं. मात्र तेव्हापासून त्याचा तपास लागत नव्हता. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून ऋषिकेशचा शोध घेतला जात होता. ऋषिकेश हा गुन्हा क्रमांक १६/२० यातला फरार आरोपी होता. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोण आहे ऋषिकेश पवार 

सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरमध्ये अनेक स्वप्न ठेवली होती. त्यात त्याचे अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते. त्या प्रोजेक्टवर ऋषिकेश हा मॅनेजर म्हणून काम करत होता. दीपेश सावंत हा सुशांतचा नोकर होता. ज्यावेळी दीपेशची चौकशी केली जात होती. त्यावेळी दीपेशनं आपल्या जबाबात ऋषिकेश पवारचंही नाव घेतलं होतं.

Narcotics Control Bureau Sushant Singh Rajput friend assistant director Rishikesh Pawar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narcotics Control Bureau Sushant Singh Rajput friend assistant director Rishikesh Pawar