दाभोलकर हत्याप्रकरणी 18 नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

मुंबई - ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयतर्फे 18 नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती आज मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.

दाभोलकर-पानसरे यांच्या निकटवर्तीयांनी ऍड. अभय नेवगी यांच्यामार्फत केलेल्या याचिकांवर न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. दाभोलकर हत्येचा तपास सीबीआय करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. या प्रकरणाचा तपास 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तोपर्यंत आरोपपत्रही दाखल करण्यात येईल, असे सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठाला सांगितले.

Web Title: Narendra Dabholkar Murder Case Charge Sheet Crime