"इथे मी ना पंतप्रधान ना मुख्यमंत्री..." ; बोहरा समाजाच्या कार्यक्रमात मोदींनी व्यक्त केली खंत - Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

Narendra Modi : "इथे मी ना पंतप्रधान ना मुख्यमंत्री..." ; बोहरा समाजाच्या कार्यक्रमात मोदींनी व्यक्त केली खंत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (१० फेब्रुवारी) वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुंबईतील मरोळ भागात दाऊदी बोहरा समुदायाच्या कार्यक्रमाला पोहोचले. यादरम्यान त्यांनी अल जामिया-तुस-सैफियाम संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी समुदायाला संबोधित केले. 

यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले की, माझी तक्रार आहे. तुम्ही त्यात सुधारणा करावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही मला वारंवार आदरणीय पंतप्रधान म्हणता. मी तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे. मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही. बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासून जोडले गेल्याचा दावा त्यांनी केला.

नरेंद्र मोदी म्हणाले, माझे भाग्य असे आहे की मी चार पिढ्यांपासून या कुटुंबाशी जोडलेला आहे. काळ आणि विकासाच्या बदलाच्या निकषांवर बोहरा समाजाने नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे. आज अल्जामिया-तुस-सैफियाह सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.

मी बोहरा कुटुंबातील सदस्य आहे. माझ्या ४ पिढ्या बोहरा मुल्सिम समाजासोबत गेल्या आहेत. या समाजाने दरवेळी स्वत:ला सिद्ध केले. पाणी वाचवण्यासाठी बोहरा समाजाचे मोठं काम आहे. परदेशात गेलो तरी बोहरा समाजातील बांधव भेटण्यासाठी येतात. त्यांचे भारतावर प्रेम आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :Mumbai NewsNarendra Modi