नरेंद्र मोदी अपयशी पंतप्रधान - राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 जून 2018

मुंबई - बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पराभूत होतील. गुजरात, कर्नाटकमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात आणि देशात होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. गोरेगाव येथे मुंबईतील बूथप्रमुखांच्या मेळाव्यात राहुल यांनी आज अनौपचारिक संवाद साधला.

मुंबई - बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पराभूत होतील. गुजरात, कर्नाटकमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात आणि देशात होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. गोरेगाव येथे मुंबईतील बूथप्रमुखांच्या मेळाव्यात राहुल यांनी आज अनौपचारिक संवाद साधला.

तब्बल 35 हजार कोटींचा गैरव्यवहार करून पळून जाणाऱ्या नीरव मोदीला पंतप्रधान भाई म्हणतात, असे राहुल यांनी सांगताच "मोदींवर बोला, मोदींवर बोला' अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यावर राहुल म्हणाले, की तेही पळून जातील. श्रीमंतांचे कर्ज माफ करणारे मोदी सरकार केवळ श्रीमंतांचे रक्षण करते. देशातील तरुण सरकारकडे रोजगार मागत आहे. कुठे गेले दोन कोटी रोजगार? जगाचे भविष्य असलेल्या भारत आणि चीनमधील रोजगाराच्या निकषावर आपण मोदींमुळे मागे पडलो आहोत, अशी टीकाही राहुल यांनी केली.

कॉंग्रेसला देशात बंधुभाव ठेवायचा असल्याने, त्यांनी आग लावली तरी आपण पाणी टाकू. संघाच्या विरोधातील विचारांची लढाई आपण कायम ठेवूया. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे माफी मागितली होती. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र कधीही माफी मागितली नाही, असेही राहुल म्हणाले.

पीयूष गोयलांवर हल्ला
"नरेंद्र मोदी आणि अल्पावधीत श्रीमंत होणाऱ्या जयेश शहा यांचे वडील' अशा शब्दांत अमित शहा यांचा उल्लेख करीत याच रांगेत भ्रष्ट म्हणून पीयूष गोयल यांचेही नाव त्यांनी घेतले. गोयल काय करताहेत ते लवकरच कळेल, असा टोमणाही राहुल यांनी मारला.

मोदी अडवानींना मान देत नाहीत
राहुल म्हणाले, की लोकसभेच्या निकालांची जाणीव झाल्याने मोदी आणि अमित शहा घाबरले आहेत. ज्येष्ठांना मान देण्याची मोदींना सवय नाही. सार्वजनिक कार्यक्रमात लालकृष्ण अडवानी यांना मी मान देतो. मात्र, अडवानींना मोदी मान देत नाहीत. वाजपेयी आजारी असल्याचे समजल्यानंतर त्यांना भेटायला जाणारा मी पहिला होतो. ज्येष्ठांना मान देणे आपले कर्तव्यच आहे.

Web Title: Narendra Modi fails Prime minister rahul gandhi politics