मोदींनी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी - विखे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई - येत्या 18 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी राज्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे आणि त्यांना थेट भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

पंतप्रधानांच्या 18 डिसेंबरच्या नियोजित कल्याण दौऱ्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. या वेळी विखे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापूर्वी मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठमोठी आश्‍वासने दिली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना एकदाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विचारपूस करायला वेळ मिळाला नाही. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सातत्याने नैसर्गिक संकटांना तोंड देतो आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. तरीही पंतप्रधान राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना दिलासा द्यायला फिरकले नाहीत.

Web Title: Narendra Modi Farmer Help Radhakrishna Vikhe Patil