नसीरुद्दीन शाह देशद्रोही नाहीत - शबाना आझमी
मुंबई - तुम्ही जेव्हा तुमच्या देशावर प्रेम करता, तेव्हाच देशात जाणवणाऱ्या त्याच्या उणिवा मांडता. प्रत्येकाला स्वत:चे विचार मांडण्याचा अधिकार आहे.
अशा परिस्थितीत एखादा कलाकार भूमिका मांडत असल्यास त्याला जाणूनबुजून देशद्रोही ठरवले जाते. पण ठाम भूमिका मांडणारे अभिनेते नसीरुद्दीन शहा देशद्रोही नाहीत, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सोमवारी व्यक्त केले.

राष्ट्रवाद आणि देशभक्ती यात फरक आहे. हा फरक मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व प्रथमच होत आहे. यापूर्वीही अनेक सरकारे आली. त्यावर लोकांनी टीकाही केली. मात्र, अशा व्यक्तींना प्रथमच देशद्रोही ठरवले जात आहे, असे आझमी म्हणाल्या.