नाशिकच्या नगरसेवकाची "राष्ट्रवादी'तून हकालपट्टी

Jayant-Patil
Jayant-Patil

मुंबई - पक्षशिस्त न पाळणारे मालेगाव महानगरपालिकेचे नगरसेवक नबी अहेमद अहेमद उल्ला यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी केली आहे, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.

मालेगाव विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात येतो. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार कुणाल रोहिदास पाटील आहेत. त्यांच्या विरोधात वंचित आघाडीतर्फे उभे राहू नका, असे नबी अहेमद अहेमद उल्ला यांना पक्षाच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु पक्षाचे न ऐकता नबी उल्ला यांनी महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com