राष्ट्रीय पुरस्कार विजेती त्रयी पुन्हा एकत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 मे 2017

मुंबई - ‘एलिझाबेथ एकादशी’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटानंतर झी स्टुडिओ, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी ही त्रयी पुन्हा एकदा ‘चि. व चि. सौ. कां.’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘सत्यप्रकाश-सावित्रीचा हा लग्नसुडोकू’ मधुगंधा कुलकर्णीच्या लेखणीतून साकारला आहे. चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

लग्नबंबाळ, धमाल गोतावळा; तसेच पर्यावरणप्रेमी सत्यप्रकाश व पराकोटीच्या प्राणिप्रेमी सावित्रीच्या नात्यांचे उलगडत जाणारे विविध पदराचे अतिशय खुमासदार पद्धतीने सांगणारी गोष्ट ‘चि. व चि. सौ. कां.’ १९ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा एक अनोखा ट्रेलर मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रदर्शित झाला. या सोहळ्याला दिग्दर्शक परेश मोकाशी, लेखिका मधुगंधा कुलकर्णी, अभिनेता ललित प्रभाकर, अभिनेत्री मृण्मयी गोडबोले, नामवंत गायक आणि गीतकार स्वानंद किरकिरे, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने आणि चित्रपटाची टीम उपस्थित होती.

Web Title: National Award winner