राज्याचा प्रजननाचा दर देशाच्या तुलनेत कमी | National family health survey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fertility

राज्याचा प्रजननाचा दर देशाच्या तुलनेत कमी

मुंबई : भारताचा प्रजननाचा दर (India Fertility rate Decreases) काही प्रमाणात घटल्याचा अहवाल राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (National family health survey) 5 मधून समोर आला आहे. मात्र, एकूण भारताच्या प्रजनन दराच्या तुलनेत राज्यातील प्रजनन दर (Maharashtra fertility rate) त्याहूनही कमी असल्याने लोकसंख्या स्थिर (population stability) होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: शहापूर : ग्रामसेवकाला लाच घेताना अटक

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 च्या अहवालानुसार, भारताच्या शहरी भागात प्रजननाचा दर 1.6 टक्के एवढा आहे तर, ग्रामीण भागात 2.1 टक्के इतका आहे. तर, 2016 -15 मध्ये सरासरी प्रमाण 2.2 टक्के एवढे होते. ते कमी होऊन यावर्षी 2 टक्के एवढे हे प्रमाण झाले आहे. दरम्यान, राज्यात हे प्रमाण भारताच्या तुलनेत फारच कमी आहे. 2019-20 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 च्या अहवालानुसार राज्यात प्रजननाचा सरासरी दर 1.7 टक्के एवढा नोंदला गेला आहे. जो 2015-16 मध्ये 1.9 टक्के एवढा होता.

महाराष्ट्र राज्याच्या शहरी भागात प्रजननाचा दर 1.5 टक्के एवढा आहे. तर,ग्रामीण भागात 1.9 टक्के एवढा प्रजननाचा दर नोंदला गेला आहे. यावरुन भारताच्या तुलनेत राज्याच्या सरासरी प्रजनन दरात घट नोंदली गेली आहे. दरम्यान, भारतासह राज्यात राबवल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाला आता यश येताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा जाहिर केला. पहिला टप्पा डिसेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.

राज्यात अजूनही मुलगी नकोशी

देशात पहिल्यांदाच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. 1990 च्या दशकात 1000 पुरुषांच्या मागे 927 महिला होत्या. ताज्या अहवालानुसार, भारतात हजार पुरुषांच्या मागे  1020 महिला आहेत. याच तुलनेत राज्यात मात्र, आजही मुलगी नकोशी असल्याचं चित्र आहे.  राज्यात 2015-16 मध्ये 1000 पुरुषांच्या मागे 952 महिला होत्या. ताज्या अहवालानुसार, राज्यात हजार पुरुषांच्या मागे  966 महिला आहेत. राज्यातील शहरी भागात हजार पुरुषांच्या मागे 954 महिला आणि ग्रामीण भागात 1000 पुरुषांच्या मागे 977 महिला होत्या.

loading image
go to top