प्रचारात राष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे नको;सामाजिक संस्थेची न्यायालयात मागणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

मुंबई - निवडणूक प्रचारामध्ये राष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे वापरण्यास बंदी घालावी, अशी मागणी सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. 

मुंबई - निवडणूक प्रचारामध्ये राष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे वापरण्यास बंदी घालावी, अशी मागणी सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. 

सम्यक दृष्टी सामाजिक परिवर्तन संस्थेच्या वतीने निवडणुकीच्या कालावधीत राष्ट्रीय नेत्यांच्या छायाचित्रांच्या वापरांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिकांसह अन्य सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून राष्ट्रीय नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर जाहीरनामा आणि पत्रकांवर केला जातो. मात्र अशी छायाचित्रे लावलेली पत्रके वाटल्यानंतर नागरिकांकडून ती रस्त्यांमध्ये किंवा अडगळीत फेकली जातात. त्यामुळे देशासाठी भरीव कामगिरी केलेल्या या नेत्यांचा अकारण अप्रत्यक्षपणे अवमान होतो, असे संस्थेचे म्हणणे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आदींच्या छायाचित्रांचा वापर राजकीय पक्षांकडून सर्रासपणे केला जातो. 

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसह राज्यपाल आणि राज्य निवडणूक आयोगालाही संस्थेकडून निवेदन देण्यात आले आहे. अशा प्रकारच्या प्रचार पत्रकबाजीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना दुखावतात, त्यामुळे प्रचारामध्ये अशी छायाचित्रे वापरण्याला मनाई करावी आणि यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

Web Title: National leaders do not want to campaign photographs