राष्ट्रीय मुक्त विद्यालयाची दहावीची परीक्षा रद्द

राष्ट्रीय मुक्त विद्यालयाची दहावीची परीक्षा रद्द

मुंबई : देशातील कोरोना आणि त्याची भयावह परिस्थिती लक्षात घेऊन मागील महिन्यात सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता नँशनल इन्स्टिट्यूट आँफ ओपन स्कूलिंगनेही (एनआयओएस) दहावीची परीक्षा रद्द केली आहे. यासाठीचे परिपत्रक काढून मंडळाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रीय मुक्त विद्यालयाची दहावीची परीक्षा रद्द
कोरोना चाचणीसाठी तोंडातून किंवा नाकातून स्वॅब घेण्याची गरज नाही, 'नीरी'चं महत्वपूर्ण संशोधन

सीबीएसई प्रमाणेच एनआयओएस या शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी योग्य पद्धत अवलंबली जाईल व निकाल जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. विद्यार्थी जर त्यांच्या निकालावर समाधानी नसतील तर त्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील सीबीएसईसह विविध शिक्षण मंडळानी देशात कोरोना आणि त्याचा सुरू असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचां निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनआयओएसनेही देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 20 जूननंतर परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला जाईल, तसेच परीक्षेच्या 15 दिवस आधी विद्यार्थ्यांना सूचना देण्यात येतील, असे आज जाहीर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com