कल्याणमध्ये 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

kalyan
kalyan

कल्याण - दुचाकी आणि कारचे आकर्षण लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या मनात असते. चुकीच्या मार्गाने वाहन शिकून अपघातही होतात. यासाठी शिक्षकवर्गाने त्यांना लहानपणीच सुरक्षेचे धडे दिल्यास रस्त्यावरील युवकांचे अपघात टाळण्यासाठी मदत होईल. कारण शाळकरी विद्यार्थी सर्वात जास्त शिक्षकांच्या सानिध्यात असतो. त्यामुळे शिक्षकांनी रस्ते सुरक्षा अभियानामध्ये सहभाग घेत प्रबोधन करण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन कल्याण आरटीओ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी एका कार्यक्रमात केले.

कल्याण आरटीओ मार्फत 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत 30 राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून याची पूर्व तयारीसाठी सोमवार ता 28 जानेवारी रोजी कल्याणमधील शारदा मंदिर विद्यालय मध्ये पूर्व तयारी बैठक पार पडली. यात महानगर पालिका शिक्षण मंडळ विस्तार अधिकारी ए टी शिंदे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाब राव पाटील, अंबरनाथ नगर परिषदचे अधिकारी गजानन मंदाडे, उल्हासनगर मनपाचे भक्ती गोरे यांच्या समवेत कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ मुरबाड तालुक्यातील विविध शाळाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेत आरटीओ मोटार वाहन निरीक्षक जफर काझी यांनी प्रास्ताविक केले. 

दरम्यान यावेळी कल्याण आरटीओ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी रस्ते सुरक्षा सप्ताह कार्यक्रम शाळा मधून का करावे ? कार्यप्रणाली कौशल्य विकास कार्यक्रमाची आखणी अशासकीय संस्थाचा सहभाग या विषयावर मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाशी संवाद साधला.

4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 30 वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह ....
इयत्ता 5 वी ते 7 वी छोटा गट निबंध स्पर्धा विषय हेल्मेटचे महत्व, मी पाहिलेला अपघात, पादचारी सायकल सुरक्षा .
5 वी ते 7 वी चित्रकला स्पर्धा...रस्ता विषयक वाहतूक चिन्हे, वाहतूक नियमन करणारा पोलीस, ट्रॅफिक पार्क, 
5 वि ते 7 वी वकृत्व स्पर्धा विषय रस्ते अपघातांची कारणे व उपाय आणि रस्त्यावरील पादचाऱ्यांची जबाबदारी 

मोठा गट 8 वी ते 10 वी निबंध स्पर्धा 
विषय - अपघाताची विविध कारणे, स्कुल बस विद्यार्थी वाहतुकीचे महत्व आणि वाहतूक चिन्हांची गोष्ट 

चित्रकला स्पर्धा विषय मी पाहिलेला अपघात, अपघात मुक्त शहर वाहतुकीचे नियोजन, रस्ते अपघातग्रस्तास मदत, वक्तृत्व स्पर्धा विषय...वाहन चालकांची जबाबदारी व कर्तव्य व वाढती वाहन संख्या शाप की वरदान 

तर शिक्षकांना निबंध स्पर्धांमध्ये विषय देण्यात आले असून विजेताना आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले असून शिक्षक, मुख्याध्यापक, शाळानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com